मुंबई : मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या निवासस्थानासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी उभी करणे, अनिल देशमुखांवर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप करणे हे सगळं महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी ठरवून केलं होतं. त्यामागे देवेंद्र फडणवीस होते मी ते विधानसभेतही म्हटलं होतं. आता ते स्पष्ट झालं आहे असं म्हणत नाना पटोलेंनी गंभीर आरोप केला आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस काही उत्तर देणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
परमबीर सिंह फडणवीसांच्या हातचे बाहुले
परमबीर सिंह हे देवेंद्र फडणवीस यांच्या हातचे बाहुले होते हे देखील स्पष्ट झालं आहे. परमबीर सिंह यांनी केलेल्या मदतीची परतफेड म्हणून शिंदे-फडणवीस सरकारने कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता निलंबन रद्द करुन पुन्हा सेवेत घेण्यासाठी मदत केली आहे. असाही आरोप नाना पटोलेंनी केला आहे
