काल घडलेल्या ओडिसा येथील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेन रुळावरून घसरल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 233 जणांचा मृत्यू झाला असून 900 जण जखमी झाल्याची माहिती अधिकार्यांनी दिली आहे.
याच पार्श्वभूमीवर मुंबई-मडगाव दरम्यान धावणाऱ्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चा आज (3जूनला) होणारा उद्घाटन कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. अशी माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोव्याची पहिली वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार होता. अपघातामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे. ओडिशामध्ये झालेल्या रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
