मुंबई : वाहतूक कोंडी मुळे पुणेकर त्रस्त झाले आहेत. १९ किमी प्रतीतास ही पुण्याच्या मध्यवर्ती भागाची तर उपनगरांचा गाड्यांचा वेग १३ ते १४ किमी आहे. या परिस्थितीत पुण्याला रिंगरोड होणे अत्यंत आवश्यक आहे. हे काम वेगाने होणे आवश्यक आहे. यासाठी हडपसर विधानसभेचे आमदार चेतन तुपे यांनी अधिवेशनात लक्षवेधी भूमिका घेतली.
वाहतूक कोंडी मुळे पुणेकर त्रस्त झाले आहेत. १९ किमी प्रतीतास ही पुण्याच्या मध्यवर्ती भागाची तर उपनगरांचा गाड्यांचा वेग १३ ते १४ किमी आहे. या परिस्थितीत पुण्याला रिंगरोड होणे अत्यंत आवश्यक आहे. हे काम वेगाने होणे आवश्यक आहे.
तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी रिंग रोडच्या… pic.twitter.com/7pIYkR4v6z
— Chetan Vitthal Tupe (@ChetanVTupe) March 26, 2023
तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी रिंग रोडच्या भूसंपादनासाठी भरघोस निधी तरतूद केली होती. पुण्याच्या वाहतूक कोंडीवर सर्व आमदारांनी एकत्र येऊन आवाज उठविण्याची गरज आहे.
दुचाकींची संख्या पुण्यात भरपूर आहे. जानेवारी महिन्यात १४६ व्यक्तींचा अपघाती मृत्यू झाला. सर्वाधिक मृत्यू हे दुचाकी स्वारांचे झाले आहे. संध्याकाळी ६ ते ९ या काळात सर्वाधिक अपघात झाले आहे. यासाठी अवजड वाहनांची वाहतूक रोखण्याची गरज आहे. दिवसेंदिवस पुण्याच्या वाहतूक कोंडीची आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांची संख्या वाढते आहे याकडे लक्ष वेधले.

