पिंपरी ; चिखली, कुदळवाडीत भंगार सामानाच्या गोदामाला शनिवारी – रविवारी मधील रात्री १ वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागली आहे. अग्निशमन दलाचे बंब मध्य रात्रीपासून आग विझवत आटोक्यात आणली. परंतु या परिसरात आता मोठमोठे रहिवासी गृहप्रकल्प होत असल्याने वारंवार होणाऱ्या आगीमुळे सोसायटीमधील नागरिक यांच्यात भीतीचे वातावरण वाढताना दिसत आहे.
गोदामातील आगीत साहित्य जळून खाक झाले आहे. घटनेची माहिती मिळताच फायरब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. आगीचे स्वरूप पाहून गाड्यांची संख्या वाढविण्यात आली. मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याने फायरब्रिगेडच्या गाड्या तात्काळ पोहचल्या आणि आग आटोक्यात आणण्यासाठी पाण्याचा वापर झाला. आगीमुळे निर्माण झालेल्या धुराचे लोटच्या लोट हवेत पसरत असल्याने वातावरणही प्रदूषित झाले आहे.
चिखली कुदळवाडी परिसरात गोदाम मधील आगीच्या दुर्घटना वारंवार होताना दिसत आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी नागरिक झोपेत असताना अचानक घडणाऱ्या या दुर्घटनामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण वाढतात दिसत आहे.. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मोठमोठे गृह प्रकल्प तयार होत आहेत. अनेक कामगार वर्ग कामावरून घरी आल्यानंतर साखर झोपेत असतो. अशावेळी भंगार गोदामांमध्ये होणाऱ्या आगीच्या दुर्घटना नागरिकांच्या आरोग्यावर व मानसिक तणाव वाढवण्यास कारणीभूत ठरताना दिसत आहेत. त्यामुळे या भागातील भंगार गोदामे इतरत्र स्थलांतरित करावी अशी मागणी काही नागरिक करत आहे.
