पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराच्या शाश्वत विकासात कंपन्यांच्या सहभागाची गरज आहे असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सी. एस. आर. मीट २०२३’ या मेळाव्यात केले. मेळाव्याचे आयोजन पिंपरी चिंचवड महापालिकेचे सी एस आर कक्ष व सी आय आय यांनी संयुक्तपणे हिंजवडी येथे एका खाजगी हॉटेलमध्ये आयोजित केले.
यावेळी सी. आय. आय कक्षाचे प्रमुख तथा टाटा मोटर्स चे जनरल मॅनेजर रोहित सरोज, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे उद्यान विभागाचे उप आयुक्त सुभाष इंगळे उपस्थित होते.
याप्रसंगी सी. एस. आर च्या माध्यमातुन शहराच्या विकासात कंपन्या कशा प्रकारे हातभार लावू शकतात याची माहिती महानगरपालिकेच्या उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली. या कार्यक्रमात विवीध प्रमुख कंपन्यांचे ३०-३५ सी. एस. आर. विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.
यात प्रामुख्याने टाटा ग्रुप कंपनी, बजाज, थर्मॅक्स,एमक्युयर ई. कंपन्यांचा समावेश होता. मा. आयुक्त यांच्या वक्तव्यास अनुमोदन देऊन न विशेषतः गरीब लोकांच्या जीवनमान सुधारण्यासाठी नजीकच्या काळात मिळून काम करण्याचे आश्वासन उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी केले . कार्यक्रमाचे संयोजन सी. आय. आय. यांनी केले तसेच सूत्रसंचालन पिंपरी चिंचवड महानगरपालिका सी. एस. आर कक्षाचे सल्लागार विजय वावरे यांनी केले.

