चिखली : चिखली गावठाणातील पाणी प्रश्न लवकरच सुटणार आहे. सामाजिक कार्यकर्ते विकास साने आणि नागरिकांच्या आंदोलन आणि पाठपुराव्यातून चिखली गावठाणातील पाणी प्रश्न प्रशासना समोर प्रकर्षाने मांडण्यात आला होता. चिखली गावठाणातील पाणी समस्या पालिका प्रशासनासमोर वारंवार मांडल्याने साने यांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. एप्रिल महिना अखेर प्रत्यक्षात पाणीप्रश्न १०० टक्के निकाली निघणार आहे अशी माहिती समोर येत आहे.
नागेश्वर विद्यालय ते विस्टरिया रस्त्याच्या बाजूने पिण्याची पाइप लाइनचे काम चालू आहे. फिल्टर प्लांट ते पाण्याची टाकी असे नवीन एक्स्प्रेस पाइप लाइनचे काम फक्त चिखली गावठाणसाठी केले जात आहे, एप्रिल महिन्यातील पहिल्या आठवड्यात हे काम पूर्ण होईल. आणि एप्रिल अखेर पाणी पुरवठा नियममित सुरू होणार आहे. यामुळे चिखली गावामधील पाणीपुरवठा 24 तास सुरू होणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर चिखलीचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार आहे.
विकासभाऊ साने यांनी हजारो नागरिकासमवेत चिखलीतील पाणी प्रश्नावर वेळोवेळी केलेल्या आंदोलनाचा परिणाम आहे. पिण्याच्या पाण्याची मोठी लाइन टाकली होती. अतिउच्च दाबाच्या (2200 HP) असलेमुळे या लाइनला डायरेक्ट कनेक्शन देणे शक्य नाही, यासाठी महानगरपालिका स्वतंत्र पाइप लाईन तसेच पंप बसवून हे काम करत आहे. फिल्टर प्लांटही नियमितपणे सुरू झालेला आहे. यामधून सध्या चऱ्होली, भोसरी, जाधववाडी या भागांना पाणीपुरवठा होणार आहे. प्रशासनाकडे तांत्रिक व मुद्देसूद केलेल्या मागणीमुळे आणि वेळोवेळी नागरिकांच्या पाणी प्रश्नासाठी केलेल्या आंदोलनामुळे चिखली गावठाणातील पाणी प्रश्न कायमचा यांनी निकाल निघणार आहे त्याचा आनंद युवानेते विकास साने यांनी व्यक्त केला.
याबाबत बोलताना साने म्हणाले की, सुरुवातीस चिखली येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारून ते पाणी कृष्णानगर येथे नेण्यात येणार होते. त्यानंतर कृष्णानगर येथून चिखलीला पाणीपुरवठा होणार होता. याच विषयाला विरोध करून आम्ही दोन हजार नागरिकासह रस्त्यावर उतरलो. चिखलीचे पाणी चिखलीला प्रथम मिळाले पाहिजे यासाठी आंदोलन केले, पालिकेवर हंडा मोर्चा काढला. यानंतर पालिका प्रशासन नरमले आणि आमचे मत विचारात घेत चर्चा केली. त्यावेळी पालिका प्रशासनाकडे तरतूद, वर्क ऑर्डर नसतानाही वेगळी पाण्याची लाईन चिखलीकरांसाठी देण्याचे नियोजन करण्यात आले. ती पाईप लाईन थेट चिखलीच्या पाण्याच्या टाकीला जोडली गेेली. यातून चिखली परिसरातील पाटीलनगर, रामदासनगर आणि चिखली गावठाण परिसरातील नागरिकाना पाणी वितरित होणार असे सांगण्यात आले. संघर्षमय पाठपुराव्याच्या सर्व घडामोडीनंतर खऱ्या अर्थाने विकास साने आणि नागरिकांच्या आंदोलनाला यश येताना दिसत आहे.

