पिंपरी, दि. ३ फेब्रुवारी :- छत्रपती शिवाजी महाराज जयंती तसेच विचार प्रबोधन २०२३ च्या अनुषंगाने शहरातील कार्यक्रमांच्या ठिकाणी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करावेत, आचारसंहितेचे पालन करून महाराजांच्या पुतळाच्या आजूबाजूची स्थापत्य विषयक कामे, रंगरंगोटी, मंडप व्यवस्था, फुलांची सजावट, विद्युत रोषणाई, आदी व्यवस्था करणेबाबत तातडीने कार्यवाही करावी, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शालेय विद्यार्थ्यांच्या निबंध, चित्रकला,वकृत्व आणि वेशभूषा स्पर्धाचे आयोजन करावे आदी सूचना अतिरिक्त जितेंद्र वाघ यांनी संबंधित अधिकार्यांना केल्या.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वाच्या अनुषंगाने शहरातील विविध शिवजयंती उत्सव समिती तसेच सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, प्रतिनिधी समवेत संबंधित महापालिका अधिकारी यांची संयुक्त बैठक आज पालिकेमधील दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत मार्गदर्शन करताना अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी अधिकार्यांना सूचना केल्या.
या बैठकीस शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता संजय खाबडे, ज्ञानदेव जुंधारे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उप आयुक्त रविकिरण घोडके, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, विजयकुमार थोरात, माजी नगरसदस्य मारूती भापकर, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, कार्यकारी अभियंता संजय घुबे, देवन्ना गट्टूवार, विजयकुमार काळे, अनिल शिंदे, देवेंद्र बोरावके, जहीरा मोमीन, जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश जाधव, प्रवीण कदम, जीवन बोराडे, सागर तापकीर, निलेश शिंदे, नकुल भोईर, धनाजी येळकर पाटील, ज्ञानेश्वर पठाडे, ज्ञानदेव लोभे, तुकाराम सुरवसे, सुरेंद्र पासलकर, तात्याबा माने, मारुती लोखंडे, सागर येल्लाळे, बबन दुबे ,सोमदत्त तेलंग, श्रीकांत गोरे, सदाशिव लोभे, अभिषेक म्हसे, जालिंदर खतकर, दर्शन तापकीर, मेघना तापकीर, अनिरुद्ध सूर्यवंशी, कैलास शिंदे आदी उपस्थित होते.
बैठकीत विविध कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या बाबतीत मंडप व्यवस्था करणे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची व परिसराची रंगरंगोटी करणे, उद्यान विषयक कामे, विधुत विषयक कामे, विचार प्रबोधन कार्याक्रमा बाबतीत विविध सूचना मांडल्या, त्यावर मार्गदर्शन करताना अतिरिक्त आयुक्त वाघ यांनी सूचनांचे स्वागत करत कार्यक्रमांच्या ठिकाणांची व परिस्थितीची लवकरच पाहणी करून केलेल्या सूचना सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे सांगितले. बैठकीचे प्रास्ताविक उप आयुक्त रविकिरण घोडके यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.

