चिंचवड : भाजप आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या निधनामुळे होवू घातलेल्या चिंचवड विधानसभेची पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज नेणाऱ्यांची संख्या शतकाजवळ येवून ठेपली आहे. पोटनिवडणुकीसाठी आज अखेर तब्बल ९३ जणांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. त्यातील केवळ चौघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवार ७ फेब्रुवारी ही शेवटची मुदत आहे. या दिवशी मान्यता प्राप्त पक्षाचे एबी फॉर्म सोबत कोण अर्ज भरते याकडे सर्वांचे नजर आहेत.
भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे ३ जानेवारी रोजी निधन झाले. त्यानंतर पंधरा दिवसांनी चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यामुळे पुण्यातील कसबा विधानसभे सह चिंचवड रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज वाटप व सादर करण्यासाठी मंगळवार ३१ जानेवारीपासून सुरूवात झाली आहे. ७ फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख राहणार आहे.
उमेदवारी अर्ज वाटप कोणत्या दिवशी कितीनी अर्ज घेतले….
पहिला दिवस : बायडाबाई ऊर्फ कल्पना सुखदेव काटे, ऍड. अनिल बाळू सोनवणे, माया संतोष बारणे, संभाजी बाळासाहेब बारणे, राजेंद्र गणपत जगताप, जावेद शेख, रविंद्र विनायक पारदे, रावसाहेब शंकर चव्हाण, प्रफुल्ला शैलेंद्र मोनलिंग, हरीभाऊ ऊर्फ हरिष भिकोबा मोरे, भोसले मिलिंद राजे, रफिक रशिद कुरेशी, बाळू तुळशीराम शिंदे, दादाराव किसन कांबळे, वहिला शहेनू शेख, अविनाश तुकाराम गायकवाड, अजय हनुमंत लोंढे, सुधीर लक्ष्मण जगताप, बालाजी लक्ष्मण जगताप, सालारभाई उमरसाब शेख या २० जणांनी अर्ज नेले आहेत.
दुसऱ्या दिवशी एकानेही अर्ज गेल्याची नोंद झाली नाही.
तिसरा दिवस : विठ्ठल उर्फ नाना कृष्णाजी काटे, सोयल शहा युनूस शहा शेख, रेखा राजेश दर्शले, संजय भिकाजी मागाडे, किशोर आत्माराम काशीकर, अक्षय विनोद जाधव, हिरामण बाबु बाबर, अश्विनी लक्ष्मण जगताप, जितेंद्र रामचंद्र वाडघरे, विजय सुभाष कलाटे, प्रकाश रामचंद्र बालवडकर, उमेश महादेव म्हेत्रे, कैलाश दशरथ परदेशी, डॉ. बाळासाहेब उर्फ सोमनाथ अर्जुन पोळ, विनायक सोपान ओव्हाळ, सुभाष गोपाळराव बोधे अशा तब्बल १६ जणांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत.
चौथा दिवस : संतोष किसन नवले, अॅड. मिलिंद रोहीदास कांबळे, शंकर पांडुरंग जगताप, मेहुल भरत जोशी, शंकर शिवाजी माने, श्रीगणेश तुकाराम कदम, राजेश यशवंतराव नागोसे, मोरेश्वर महादू भोंडवे, नंदू गोविंद बारणे, दयानंद नानासाहेब सरवदे, प्रविणकुमार अशोक कदम, ज्ञानेश्वर तुळशीराम मलशेट्टी, श्रीकांत शहाजी गोरे, रवि रमेश नांगरे, प्रशांत कृष्णराव शितोळे, निखील दिगंबर भोईर, मनोज मधुकर खंडागळे, भाग्यश्री निखील भोईर, सतीश श्रावण कांबिये, झेविअर अॅन्थोनी, सुरेश एकनाथ जगधने, सचिन दत्तातत्रय धनकुडे, सायली किरण नढे, सुहास पोपट गजरमल, प्रतिमा विनोदसिंह राजे, काटे आनंद दिपक, दिलीप खंडुजी पांढरकर, प्रियंका सलील कदम, राहुल निवृत्ती मदने, स्वप्नील भागीरथ बनसोडे, भाऊसाहेब सोपानराव भोईर, राजश्री ज्ञानेश्वर कोरडे या ३२ जणांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत.
एकूण ९३ इच्छुकांनी अर्ज घेतले असले तरीही यामधील केवळ चौघांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर केले आहेत. त्यामध्ये ऍड. अनिल बाबू सोनवणे, मिलिंद कांबळे, अजय लोंढे आणि रफिक रशिद कुरेशी यांचा समावेश आहे.
