वाघेरी ता.कराड येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ माजी सहकार मंत्री आ.बाळासाहेब पाटील यांचा शुभहस्ते गुरुवार दिनांक ०२ फेब्रुवारी २०२३ रोजी संपन्न झाला.
यावेळी जिल्हा वार्षिक योजनेतून सर्वसाधारण साकव अंतर्गत खोपीचा माळ पाणंद रस्त्यावर साकव पूल बांधणे, कोयना भूकंप व पूनर्वसन निधीतून वाघेरी मेरवेवाडी जुना रस्ता मुरमीकरण करणे / संरक्षण भिंत बांधणे, डोंगरी विकास निधी योजनेतून टाकेवस्तीकडे जाणारा रस्ता सुधारणा करणे, अर्थसंकल्प मार्च २०२१ व नाबार्ड २६ योजना – वाघेरी पाचुंद रस्त्यावर गावालगत स्मशानभूमी शेजारील ओढ्यावर उंचपूल बांधणे या कामांचे उद्घाटन, तसेच जलजिवन मिशन योजनेतून मौजे वाघेरी येथील अस्तीत्वातील नळ पाणी पुरवठा योजनेची पुर्नजोडणी करणे, स्थानिक विकास निधीतून वाघेरी यथे मुख्य रस्ता ते कणसे मळा रस्ता सुधारणा करणे या कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश आय.टी. सेलचे अध्यक्ष सारंग पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगरव जगदाळे, पंचायत समितीचे माजी सभापती प्रणव ताटे, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संचालक जशराज पाटील, प्रशांत यादव, शंकरराव खापे, पांडुरंग चव्हाण, लहुराज जाधव, गोविंदराव थोरात, चंद्रकांत कदम, बाळासो सुर्यवंशी, नवाज सुतार, पराग रामुगडे, मोहम्मद आवटे, निखिल शिंदे, ताजुद्दीन संदे, युवराज शिंदे, विजय अतकरे, फात्तेसिंह जाधव, गणेश नलवडे, भिमराव नलवडे, सिद्धार्थ चव्हाण, संभाजी शिंदे, बापूराव शिंदे, अरुण जाधव, बबन जगताप, सुनील पोळ, अशोक सुर्यवंशी, ज्ञानदेव डुबल, अरविंद यादव, एम.डी.पटेल, किसन डांगे, अशोक कदम, इम्रान पटेल, दत्तू माळी, दौलत पटेल, दादामिया पटेल, नबीलाला मुल्ला, महंमद नांगरे, बशीर पटेल, कमाल मुजावर, हसीम पटेल, जगन्नाथ डांगे, आनंदराव डांगे,गुलाम पटेल, प्रल्हाद कणसे, आनंदराव भोसले, ए. आर.पटेल, अंतूनाना भोसले, रहीम पटेल, सिराज मुल्ला, बालम मुल्ला, कासम मुल्ला, मुबारक मुल्ला, चाँद पटेल, उत्तम माळी, राजाराम पानस्कर, दिनकर नावडकर, अशोक कोळी, मुश्ताक पटेल, अली पटेल, कृष्णत यादव, जुबेर पटेल, मज्जीद मुल्ला, सरफराज पटेल, अन्सार पाटील, समीर पटेल, उमर पटेल, मुनिर पटेल, महेंद्र कणसे, केदार कणसे, विजय भोसले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता आर.एस.टोपे, पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता अहिरे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता देशमाने, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नवाळे, कनिष्ठ अभियंता एन.आर. बद्राणी व ग्रामस्थ उपस्थित होते.

