सातारा : ज्येष्ठ किर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रूक्मिणी सातारकर यांचे आज (दि.२) अल्पशा अजाराने नवी मुंबई (नेरुळ) येथे निधन झाले.
त्या ८५ वर्षांच्या होत्या. अध्यात्माच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी बाबा महाराजांसोबत त्यांनी सक्रिय योगदान दिले आहे. त्यांच्या पार्थिवावर नेरूळमधील स्मशानभूमीत सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सातारकर परिवाराचे निकटवर्ती माजी नगरसेवक शिवराम पाटील यांनी दिली.

