मुंबई: अदानी एंटरप्रायझेसच्या एफपीओबाबत अदानी ग्रुपने एक मोठा निर्णय घेतला आहे. अदानी समूहाने आपला FPO मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. गौतम अदानी यांच्या अदानी एंटरप्राइजकडून २० हजार कोटी रुपयांचा एफपीओ मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अदानी समुहाच्या संचालक मंडळात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. अदानी समूहाकडून पत्रक काढून हा निर्णय जाहीर करण्यात आला.
कंपनीने नुकतेच अदानी एंटरप्रायझेसचे एफपीओ जारी केले होते आणि ३१ जानेवारीपर्यंत गुंतवणूकदारांना येथे पैसे गुंतवण्याची संधी होती. पण, अर्थसंकल्पाच्या दिवशी कंपनीने आपला एफपीओ मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
इतकंच नाही तर त्यांनी गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचं आश्वासनही दिलं आहे. कंपनीने एक निवेदन जारी करत याबाबत माहिती दिली. यामध्ये गुंतवणूकदारांचे पैसे परत करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

