चांदखेड – येथील न्यू इंग्लिश स्कूल, चांदखेड या विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आमदार मा.सुनिल अण्णा शेळके व मावळ डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयडियल स्टडी अँप मोफत देण्यात आले. इयत्ता १०वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत उज्ज्वल यश मिळावे व विद्यार्थ्यांचे जीवन आनंददायी व यशस्वी व्हावे, यासाठी हे स्टडी अँप या विद्यालयातील इयत्ता दहावीच्या एकूण १४६ विद्यार्थ्यांना व १० शिक्षकांना मोफत देण्यात आले.
हा उपक्रम संपूर्ण तालुक्यात गेल्या पाच वर्षांपासून राबविला जात आहे. या प्रसंगी मावळ डेव्हलपमेंट फाउंडेशनचे शैक्षणिक सल्लागार महेश चन्ने, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सिमा भोसले, जेष्ठ शिक्षक एस ए पवार तसेच सामाजिक कार्यकर्ते सचिन गायकवाड, दिनेश गायकवाड, अमित कदम, लखन गायकवाड, आकाश गायकवाड व ऋषिकेश पशाले उपस्थित होते.
