मुंबई : ठाकरे गटातील शिवसेना फुटून एकनाथ शिंदे गटासोबत जात असल्याचे वारंवार दिसत आहे. दरम्यान आता शिंदे- भाजपला शिवसेना ठाकरे गटाने मोठा धक्का दिला. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठी खेळी खेळत भाजपच्या भावालाच गळाला लावत त्याच्यावर मोठी जबाबदारी देखील देण्यात आली आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणूकीत भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढलेले माण-खटाव मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांचे सातारा हे होम पीच आहे. शिंदे गटाला टक्कर देण्यासाठी शिवसेनेला मोठ्या आणि प्रभावी चेहऱ्याची गरज होती.
त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शिव व्याख्याते नितीन बानुगडे यांना बाजूला करत सातारा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून शेखर गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे साताऱ्यात ठाकरे गटाला मोठी उभारी मिळू शकते. शेखर गोरे हे आक्रमक नेते आहेत. त्यामुळे साताऱ्यात शिवसेना वाढवण्यासाठी त्यांचा चांगला फायदा ठाकरे गटाला होवू शकतो. त्यामुळं आता भाजप विरूध्द ठाकरे गट असा सामना साताऱ्यात पाहिला मिळू शकतो.
