आळंदी : अजित पवार जिल्ह्यातील दौऱ्यावर असताना त्यांनी आळंदीत जाऊन ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घेतले. मात्र याची माध्यमांमध्ये कुठेही वाचता झाले नाही. त्यांनी मंचर या ठिकाणी कार्यक्रमाला जात असताना आले मनी तर दर्शनाला पोहचले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घेऊन पुढे कार्यक्रमाला निघून गेले.
अनेकवेळा राज्यातील मोठे राजकारणी कोणत्याही देवाच्या दर्शनाला आले की त्याच्या इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून मोठ्या बातमी होतात. दोन दिवसापूर्वी राज्यातील बंडखोर चाळीस आमदार गोहाटी ला देवी दर्शनाला गेले तर माध्यमांमध्ये तीन ते चार दिवस याच बातम्या चालल्या होत्या. मात्र अशा यात्रेबाबत बोलताना अजित पवार यांनी आम्हीही दर्शनाला जातो, मात्र मीडियाचे कॅमेरे सोबत घेऊन जात नाही असं म्हणाले. काही लोकांना शो करण्याची सवय आहे, असं बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्याच्या आमदारांना अजित पवारांनी टोला लगावला.
अजितदादांनी काल आळंदीत शैक्षणिक बाबतीत काही चांगल्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले.”कोव्हिडच्या काळात अॉनलाईन शिक्षण झाले तरी ते परिपूर्ण नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनात निर्माण झालेली पोकळी,” यावर काही करण्याची गरज त्यांनी बोलून दाखविली आहे. शिक्षणाच्या बाजारीकरणालाही दादांनी स्पर्श केला. तसेच केवळ पटसंख्येचे कारण दाखवून दुर्गम भागातील शाळा बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयावर स्पष्ट नाराजी व्यक्त केली. उद्याच्या पिढीच्या भवितव्याची चिंता वाहणारे एक परिपूर्ण आणि प्रगल्भ नेतृत्व म्हणून दादांनी आपली मते व्यक्त केले.
