भारतीय वायदे बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या किमतीत घसरण झाल्याची पाहायला मिळत आहे. आज, सोमवार, नोव्हेंबर 28, 2022 रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किमतीत 102 रुपयांनी घसरण झाली आहे. सोन्याचा भाव 0.19% नी कमी झाला असून 52,422 रुपयांवर खाली आला आहे तर दुसरीकडे चांदीच्या फ्युचर्स किमती 0.55% ने म्हणजेच 341 रुपयांची घट झाकी आहे. सध्या चांदी 61,335 रुपयांवर व्यवहार करत आहे.
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,560 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,980 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,560 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,980 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,560 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,980 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तपासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

