पिंपरी :- भरधाव वेगात गाडी चालवून समोरील अॅक्टीव्हाला पाठीमागून धडक दिली. त्यात दुचाकी चालक किरकोळ जखमी झाले. त्यांच्या अॅक्टीव्हाचे नुकसान झाले. आरोपी कारचालक (एम.एच १२ जेसी ९१८०) घटनास्थळावरून पळून जात असतानाच त्यास अॅक्टीव्हा चालकाने लोकांच्या मदतीने पकडले.
पोलीस नियंत्रण कक्षास मदतीसाठी पाचारण केले. फिर्यादी पोलीस शिपाई हे सहकाऱ्यासह घटनास्थळी पोहोचले. आरोपीस कारवाई करिता ताब्यात घेत असताना फिर्यादीला आरोपीने शिवीगाळ केली. आरोपीला पोलीस स्टेशन येथे आणले असता त्याने तिथेही मोठयाने आरडा ओरडा केला. फिर्यादी पोलीसासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली. फिर्यादीच्या अंगावरील ड्रेस ओढून त्यांच्याशी झटापटी करीत ‘ तुम्ही पोलीस माझ्यावर कशी काय कारवाई करता हेच पहातो ‘ असे म्हणत त्यांच्या डाव्या हातास चावा घेतला. सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
ही घटना (दि.२७) रोजी ५.२० वा. चे सुमारास भाजीमंडई ओटास्किम, अंकुश चौक, ओटास्कीम व निगडी पोलीस स्टेशन येथे घडली. निगडी पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई थोरात यांनी आरोपी चंद्रकांत अंकुश चव्हाण (वय ३४ वर्षे, रा. रुपी हौ. सोसा. रेणुका मंगल कार्यालयाजवळ, रुपीनगर, तळवडे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. निगडी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

