पुणे – शहरात गावठी कट्टे सहजा सहजी मिळत असल्याने दहशतीसाठी त्याचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. अगदी मोलमजुरी करणारे आणि रिक्षाचालक सुद्धा गावठी कट्टा घेऊन फिरु लागले आहेत. अशाच प्रकारे गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या एका मजुरास आणि रिक्षा चालकास विमानतळ पोलिसांनी अटक केली.
संतोष शंकर गुंजाळ (26, रा. हडपसर), असे अटकेतील आरोपीचे नाव आहे . त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि दोन काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार गिरीष नाणेकर, सचिन जाधव आणि सचिन जाधव यांना गस्ती दरम्यान आरोपी संतोष हा पिस्तूल घेऊन कोणाची तरी वाट पहात असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून संतोषला अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीत तो मोलमजुरी काम करीत असून दहशत माजवण्यासाठी पिस्तूल जवळ बाळगल्याचे सांगितले. त्याने पिस्तूल कोठून आणले होते, याचा तपास करण्यात येत आहे.
तर दुसऱ्या एका कारवाईत रिक्षा चालक रामकृष्ण भोंडवे ( रा. चिंचवड) यास दोन गावडी कट्टे आणि सहा काडतुसांसह अटक करण्यात आली. दोघांविरुध्द आर्म ऍक्टनूसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई उपनिरीक्षक रवींद्र ढावरे, अंमलदार अविनाश शेवाळे, गणेश साळुंके, रुपेश मिसाळ, नाना कर्चे, योगेश थोपटे आणि रुपेश तोडेकर यांच्या पथकाने केली.
