नवी दिल्ली : नोटबंदीच्या निर्णयाच्या विरोधातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून ज्येष्ठ वकील आणि एक याचिकाकर्ते व भारताचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केली. या निर्णयावर जोरदार टीका केली. नोटबंदीचा निर्णय घेताना अगोदर चलनात असलेल्या नोटा आणि नव्याने आणल्या जाणाऱ्या नोटा या कशाचाही विचार सरकारने केला नव्हता, अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.
काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला होता असे सरकारकडून सांगितले जाते आहे. त्या दाव्यालाही चिदंबरम यांनी प्रतिवाद केला. दोन हजाराची नोट आणल्यामुळे उलट काळा पैसा साठवून ठेवणे आणखीनच सोपे झाले असल्याचे सांगताना त्यांनी ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी एका खटल्यात सुटकेसमध्ये १ कोटी रुपये कसे आले याबाबत सवाल उपस्थित केला.
फक्त २ लाख कोटी रुपये शिल्लक होते..
चिदंबरम म्हणाले की, नोटबंदी करण्यापूर्वी देशात १७.९७ लाख कोटी रुपये होते. त्यात हजार आणि पाचशेच्या नोटा होत्या. या नोटा बाद झाल्यावर केवळ २ लाख कोटी रुपये देशात शिल्लक होते. ही रक्कम अर्थव्यवस्था टिकवण्यासाठी पुरेशी नाही. तसेच नोटबंदी करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक घेऊ शकते. केंद्र सरकारकडे तो अधिकार नाही.
