काही दिवसांपूर्वी आपण इंदोरमधील दारुच्या नशेत चार तरुणींनी एक तरुणीला केलेली हाणामारीचा व्हिडीओ पाहिला होता. सोशल मीडियावर दारुच्या नशेत तरुणींचा धिंगाणाचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. असाच एक तरुणीचा दारुच्या नशेत उच्चभ्रू वसाहतीतील हाय व्होल्टेज ड्रामाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या तरुणीने दारुच्या नशेत जे कृत्य केलं ते पाहून नेटकऱ्यांनी कपाळाला हात मारून घेतला आहे.
बयेचं डोकं फिरलंय!
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता नशेत तर्र अशी एक तरुणी दिसतंय. ती तरुणी लिफ्टमध्ये असून रागाच्या भरात पोलीस आणि बिल्डिंगमधील वॉचमन समोर अंगावरील कपडे काढतं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता महिला वॉचमनशी तूतूमैमै करत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
वॉचमनने सिगारेट आणण्यास नकार दिला म्हणून तरुणीचा राग अनावर झाला आणि तिने राडा घ्यालायला सुरुवात केली. वॉचमनने अखेर पोलिसांना बोलवून घेतलं. आपल्याला पोलीस पकडून नेणार म्हणून तरुणीने चक्क अंगावरील कपडे काढले.
तरुणीने दिलं स्पष्टीकरण
या घटनेनंतर तरुणीने आपल्या कृत्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. ही तरुणी एक मॉडेल (Model) आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिने या घटनेसंदर्भात स्पष्टीकरण दिलं होतं. ती म्हणाली की, सिगारेटच्या घटनेनंतर वॉचमनने (Watchman) पोलिसांना (mumbai police) फोन केला. पोलीस मला रात्रीच्या अडीच वाजता नेण्यासाठी आले होते. त्यांच्यासोबत महिला पोलीसही नव्हती. या सर्व गोंधळात काय करावे मला सूचले नाही, असे मॉडेलने सांगितले. त्यांना विरोध करण्यासाठी मी माझा नाईट ड्रेस काढला आणि तुमच्या सोबत येणार नाही असं सांगितलं. तेव्हा पोलीस निघून गेले, असेही तिने सांगितले. ते माझ्यावर बलात्कार करणार नाही ना किंवा माझी हत्या करणार नाही ना? या भीतीने आणि मी माझ्या अंगावरचे कपडे काढले, असेही मॉडेलने सांगितले.
ही घटना मुंबईतील ओशिवरा परिसरात घडली होती. तर हा व्हिडीओ खूप जुन्या असून पुन्हा एका सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे असे व्हिडीओ व्हायरल करताना नेटकरांनी हा व्हिडीओ जुन्हा असल्याचं बोलंल गेलं पाहिजे. अन्यथा लोकांमध्ये गैरसमज पसरू शकतो.
