मुंबई : आचार्य चाणक्य धोरणे-विचार जुन्या काळात जितकी प्रभावी होती तितकीच ती सध्याच्या काळातही व्यावहारिक आहेत. आपल्या धोरणांमध्ये त्यांनी मित्र, वैवाहिक जीवन, प्रेमप्रकरण आणि शत्रूंबाबत अनेक सल्ले दिले आहेत. कित्येक लोक आजही आचार्य चाणक्य यांच्या धोरणानुसार चालतात. त्यांची नीती अवलंबल्यास कधीच अपयश येत नाही, असे मानले जाते. आचार्य चाणक्यांची अनेक धोरणे लोकप्रिय आहेत. यात स्त्री-पुरुषांच्या नात्याबद्दलही सांगितले आहे.
जोडीदार – आचार्य चाणक्य यांच्या धोरणानुसार, प्रत्येक पुरुष किंवा स्त्रीला एक उत्तम जीवनसाथी शोधण्याची इच्छा असते, जो प्रत्येक सुख-दु:खात त्याची साथ देईल. आचार्यांच्या मते, जर आपण स्त्रियांबद्दल बोलायचे झाल्यास ती पुरुषांमध्ये काही गुण शोधण्याचा प्रयत्न करते. पुरुषांमध्ये खालील काही गुण असतील तर त्यांना महिला लगेच पटतात.
व्यक्तीमत्व : अनेक लोकांचा असा विश्वास असतो की, स्त्रिया पुरुषांच्या सौंदर्याकडे जास्त आकर्षित होतात, पण तसे नाही. महिलांना पुरुषांचे सौंदर्यापेक्षा त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक आवडते. स्त्री सौंदर्यापेक्षा व्यक्तिमत्त्वाला महत्त्व देते.
प्रामाणिक – जो पुरुष वैवाहिक किंवा प्रेम संबंधांमध्ये प्रामाणिक असतो आणि इतर कोणत्याही स्त्रीवर वाईट नजर ठेवत नाही. स्त्रिया अशा पुरुषांकडे पटकन आकर्षित होतात आणि प्रेमसबंध आणि पुढे लग्नासाठी तयार होतात.
दुसऱ्याचे मत ऐकणारा – अनेकदा पुरुषांचे वागणे असे असते की, त्यांना त्यांचा दृष्टिकोन वरचढ ठरवायचा असतो आणि इतर कोणाचेही ऐकायचे नसते, पण स्त्रिया अशा जीवनसाथीचा शोध घेतात, जो त्यांच्या बोलण्याला, त्यांच्या मतालाही प्राधान्य देतो आणि त्यांचे म्हणणेही ऐकतो. दुसऱ्याचे म्हणणे ऐकण्याबरोबरच तो चांगला श्रोताही असावा.
