पिंपरी : मनसे युवानेते अमित ठाकरे यांचा चिंचवड मध्ये हेमंत डांगे यांच्या निवासस्थानी जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी ७०० किलो फुलांचा हार स्वागतासाठी आणला होता. यावेळी भाजपचे मा. नगरसेवक मोरेश्वर शेडगे, भाजपचे नेते प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे ,भाजपचे उपाध्यक्ष विजय फुगे यांनी अमित ठाकरे यांचे चिंचवड येथे हेमंत डांगे यांच्या घरी पिंपरी चिंचवड भाजपतर्फे स्वागत केले.
यांनतर आकुर्डी केरला भवन येथे ६०० ते ७०० विद्यार्थी बरोबर संवाद साधला व विद्यार्थीचे अनेक प्रश्न व सुचना ऐकुन घेतल्या तसेच विविध क्षेत्रातील खेळाडू व गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये मध्ये नोंद झालेल्या सात वर्षांच्या देशना नहार या मुलीचा देखील सत्कार करण्यात आला या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना हि चांगल्या प्रकारे काम करत आहे व येणार्या काळात विद्यार्थीच्या हितासाठी भरघोस कार्य करण्याच्या सुचना केल्या व तसेच त्यांनी सांगितले की तुम्ही ज्या ज्या वेळी मला बोलवाल तेव्हा मी शहरात येईल असे देखील सांगितले व सर्वांचे कौतुक केले.
हा संवाद दौरा कार्यक्रमाचे नियोजन मनविसे उपाध्यक्ष अनिकेत प्रभु, सचिव अक्षय नाळे, विभाग अध्यक्ष प्रतिक शिंदे, विकास कदम, सुमित कलापुरे, आकाश लांडगे, संघटिका श्रध्दा देशमुख, आकाश पांचाळ, सिध्देश सोनकवडे, निकिता दुसाणे, सोनल गावडे, राजेश आवसरे, ओंकार पाटोळे, शरण्य पाटणे, आदित्य भिलारे, दिंगबर सोळवंडे, स्वप्निल महांगरे, आदिती चावरीया, मृणाल सोमवंशी, माणिक शिंदे, शंतनू तेलंग, ओकांर रेणुसे, यश कुदळे, यांनी दौरा यशस्वी करण्यासाठी कष्ट घेतले.
याप्रसंगी मनसे नेते किशोर शिंदे, गणेश सातपुते, मनविसे सरचिटणीस गजानन काळे, आशिष साबळे, शहर अध्यक्ष सचिन चिखले, मयुर चिंचवडे, बाळा दानवले, अंकुश तापकीर, राजु सावळे, दत्ता देवतरासे, विशाल मानकरी, सुशांत साळवी, महीला अध्यक्ष अश्विनी बांगर ,अनिता पांचाळ ,प्रिती परदेशी हे उपस्थित होते.
ताथवडे येथील घुंगराचा आवाज घेऊन अंध फुटबॉल महिला खेळाडू सोबत फुटबॉल खेळुन त्यांना प्रोत्साहन दिले. यावेळी खेळासाठी लागणारा खर्च देण्याचा शब्द अमित ठाकरे यांनी दिला. अमित ठाकरे यांच्या शहरातील आगमनामुळे इतर पक्षातील राजकारण्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. याचा फायदा येणाऱ्या पालिका निवडणूकीमध्ये मनसेला होईल असे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पिं.चिं शहर अध्यक्ष हेमंत महादेव डांगे यांनी म्हटले आहे.
