पिंपरी : राष्ट्रध्वज प्रत्येकाच्या घरावर अभिमानाने फडकवावा यासाठी ”हर घर तिरंगा” मोहिमेतून महानगरपालिकेने कोणतेही दर न आकारता राष्ट्रध्वजाची विक्री न करता महापालिकेमार्फत मोफत द्यावा अशी मागणी माजी नगरसेवक प्रश्नात शितोळे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सीजन ग्रुप ट्रस्टच्या वतीने आमच्या सांगवीतील प्रत्येक घरात राष्ट्रध्वज तिरंगा “भेट अभिमानाची” म्हणून देणार आहे. तसे पालिकेने प्रत्येक मिळकती धारकाला राष्ट्रध्वज तिरंगा “भेट अभिमानाची” म्हणून कोणतेही शुल्क न आकारता भेट द्यावा असे शितोळे यांनी म्हटले आहे.
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभर अतिशय आनंदात उत्साहात साजरा होत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सुद्धा गेल्या वर्षभरामध्ये ”आजादी का अमृत महोत्सव” साजरा करताना विविध कार्यक्रम राबविले. 75 तासात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून काही सुविधा नागरिकांना चांगल्या पद्धतीने विकसित केलेल्या दिसून येतात.आता राष्ट्रभिमान म्हणून प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान दिलेली परवानगी ही प्रत्येक घरावर तिरंगा फडकला जावा व जगभरात देशाच्या अमृत महोउत्सवाचा अभिमान वाटावा अशा रीतीने साजरा करण्यासाठी सर्वच भारतीय उत्साही आहेत.
एका बाजूला राष्ट्र अभिमान राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रेम असताना दुसऱ्या बाजूला पिंपरी चिंचवड महापालिका मात्र शहरातील काही ठराविक मिळकतींना म्हणजे केवळ 7-8 हजार मिळकतींना मोफत राष्ट्रध्वज देऊन इतर लाखो मिळकतींचा एक प्रकारे अपमान करणार का? स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रत्येक व्यक्तीने साजरा करावा. परंतु महानगरपालिकेने राष्ट्रध्वज वाटप करताना
दुजाभाव करू नये, कोरोना काळामध्ये कोट्यावधीचे मास्क, साबण, सॅनिटायझर मोफत वाटण्यात आले व त्या वस्तूंचे आयुष्य संपले सुद्धा. त्यात आरोपही झाले. महापालिकेत हजारो कोटी रुपयांची निविदा दरवर्षी प्रसिद्ध होत असतात, अनेक विकास कामे होत असतात.अनेक भ्रस्ट्राचाराच्या कामाने आणि पालकेतील कर्मचारी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकली आहेत. त्यामुळे पालिकेची प्रतिमा मलीन झाली आहे. हार घर तिरंगा मोहिमेतून पालिकेचा अभिमान बाळगण्याची संधी दरवर्षी येणार नाही. त्यामुळे महानगरपालिकेमार्फत शहरातील प्रत्येक मिळकतीला राष्ट्रध्वज कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता मोफत द्यावा असे शितोळे यांनी म्हटले आहे.

