
वडगाव मावळ : मावळ तालुक्याची कन्या स्व. स्वरा जनार्दन चांदेकर हिचे दि. ०३ ऑगस्ट २०२२ रोजी दुर्दैवी असे निधन झाले. ही झालेली घटना अत्यंत वाईट असुन आपणास झालेले दुःख हे अगणिक आहे. परमेश्वर आपल्या झालेल्या दुखातुन सावरण्याची शक्ती देवो तसेच स्व. स्वरा जनार्दन चांदेकर हिच्या मृतात्म्यास चिरशांती लाभो अशी शोकसभा वडगाव मावळ बार असोसिएशन तर्फे आयोजित केली होती.


वडगाव मावळ बार असोसिएशनतर्फे आरोपीचा जाहीर निषेध करण्यात आला. याबाबतचे पत्र बार असोसिएशन तर्फे पीडित कुटुंबीय यांना देण्यात आले आहे. यात चांदेकर कुटुंबात झालेल्या दुःखात आम्ही वडगाव मावळ वार असोसिएशनचे सर्व सदस्य सहभागी आहोत. तसेच सदरील गुन्हयातील आरोपी याचे वकीलपत्र हे देखील वडगाव मावळ मधील कोणतेही वकील घेणार नसले बाबत ठराव आजरोजीचे एकमताने मंजुर करण्यात आला आहे. अशी माहिती अध्यक्ष अँड. मच्छिंद्र शंकरराव घोजगे यांनी प्रसिद्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावर उपाध्यक्ष अँड. अविनाश मारुती पवार, सचिव अँड. हेमंत दत्तात्रय वाडेकर, अँड. सुधा सचिन डिमळे (शिंदे), खजिनदार अँड. शैलेंद्र दिनकरराव घारे, सदस्य अँड. प्रशांत विश्वनाथ दाभाडे, अँड. निलेश चांगदेव हांडे, अँड. निवेदिता महेश जैन, अँड. अजय विश्वनाथ घोजगे, अँड. धनेश रमेश पटेकर, अँड. बबिता मयुर टकले, अँड. रुविया अनिसभाई तांबोळी यांच्या सह्या आहेत.

