
तळेगाव :- माजी उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या जन्मदिना निमित्त मावळात आयोजित केलेल्या ‘अजित सप्ताह’ मध्ये मावळ तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने मावळ तालुक्यातील विद्यार्थ्यांना २ हजार ५०० वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे.


या वहीचे प्रकाशन आमदार सुनील शेळके, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, कार्याध्यक्ष साहेबराव कारके, युवक तालुकाध्यक्ष किशोर सातकर, संजय गांधी समितीचे अध्यक्ष नारायण ठाकर, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक अंकुश आंबेकर, ओबीसी सेल जिल्हा कार्याध्यक्ष अतुल राऊत, तालुका प्रवक्ते राज खांडभोर , ग्रामीण अध्यक्ष आशिष ढोरे, विद्यार्थी कॉ.अध्यक्ष समीर कदम विद्यार्थी कार्याध्यक्ष आशिष माने, विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष अजिक्य टकले,विद्यार्थी उपाध्यक्ष सुशांत बालगुडे, नाणे मा.अध्यक्ष अजय मांडेकर प्रणव भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

